बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील हिरडव येथील सूरज राजू बांगर हे दार्जिलिंग या ठिकाणी भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत, ते दिवाळीच्या सुट्टीसाठी गावात आले असताना गावातील 30 ते 40 जणांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबावर जोरदार हल्ला केला,
यामध्ये महिलांसह तीन ते चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, घटनेची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात देण्यात आली मात्र अजूनही आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली नसल्याच सैनिकाकडून सांगण्यात आल आहे.
त्यामुळे येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा सैनिकाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा